सेवासदन संस्थेचा ९७ वा वर्धापन दिन दि. २ जानेवारी २०२४ रोजी नागपूर येथे आयोजित केला होता. या प्रसंगी डॉ. गजानन डांगे यांनी प्रमुख अतिथि म्हणून उपस्थिती दर्शवली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उद्योजक मा. श्री. शंकर मुरारका उपस्थित होते.
आपल्या देशाची प्राचीन रूढी परंपरा कायम राखून देशाचा सर्वांगीण विकास व्हायला हवा . ऋतुप्रमाणे सर्वांनी पोषक आहार घ्यावा. असे यावेळी डॉ. डांगे यांनी सांगितले. आजच्या घडीला भारताच्या अमृत काळाची माहिती शालेय पाठ्यक्रमात समावेश करण्याची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.