जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवानिमित्त जनसहभागा द्वारे २५००० वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ अत्यंत मंगलमय, श्रद्धा युक्त वातावरणात जिल्ह्यातील संताच्या, मान्यवरांच्या हस्ते वृक्ष पूजन व वृक्ष रोपणाने झाला. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वृक्ष पूजन करून या मोहिमेतील सर्व तालुकानिहाय गट प्रमुख आणि सहकारी कार्यकर्त्यांनी वृक्ष संवर्धन करून कंकण बांधून वृक्ष संवर्धनाचा संकल्प घेतला. या प्रसंगी प्रमुख पाहणे म्हणून श्री.गजानन डांगे, योजक, श्री.पंकज पाठक – वात्सल्य सेवा समिती, श्री.प्रभाकर पटेल – चेअरमन सरदार पटेल शैक्षणिक संकुल, पातोंडा, प.पू.संत तारादासजी बापू – बंद्रीझिरा ता.नंदुरबार, भागवत कथाकार श्री.अविनाश महाराज नंदुरबार, आप की जय संप्रदाय प्रमुख जितू पाडवी, स्वाध्याय परिवाराचे संतोष जाधव, वारकरी संप्रदाय प्रमुख ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज – नंदुरबार, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. गुलाबसिंग वसावे, धनाजे धडगाव, कार्यक्रमात NDDC सदस्य , वात्सल्य सेवा समिती सदस्य, जिल्ह्याच्या विविध भागातून अभियानातील सहभागी नागरिक, शहरातील लायन्स, रोटरी पदाधिकारी, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, आर्किटेक्ट्स, शिक्षक प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सरदार पटेल शैक्षणिक संस्थेच्या सहकार्याने योजक, NDDC आणि वात्सल्य सेवा समिती नंदुरबार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पुरुषोत्तम काळे तर आभार श्री. पंकज पाठक यांनी मानले.