Policy Advocacy and Research Centre ही धोरण निर्माण विषयातील महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाची संस्था आहे. त्यांनी १२-१३ जुलै ला पुण्यातील यशदा संस्थेत समाज आणि शासन नीति अध्ययनाची दिशा , व्याप्ती व कार्यपद्धती यावर चिंतनासाठी दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले होत
निती निर्धारण अध्ययन गट अभ्यास वर्ग या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या साठी महाराष्ट्रातून २१४ निमंत्रित उपस्थित होते.
योजकचे राष्ट्रिय अध्यक्ष डाॅ. गजानन डांगे यांनी दोन सत्रांमधे ‘ धोरण अध्ययनाची दिशा आणि कार्यपद्धती ‘ या विषयावर मार्गदर्शन केले. या मधे धोरण निर्मिती मागील भूमिका, या संबंधीचे भारतीय चिंतन, धोरण निर्मीतीची गरज, कार्यकर्त्यांनी या कडे कसे बघावे, या संबंधी झालेले काही प्रयत्न अशा विविध मुद्यांचा समावेश होता. या कार्यक्रमातील हे महत्वाचे सत्र होते. यातून एकूणच या गटाला पुढील कामाची दिशा मिळाली.
सत्रानंतर अनेकांनी संपर्क करून सत्राबद्दल आनंद व्यक्त केला आणि पहिल्यांदा धोरण निर्मिती विषयात काम कसे करावे या बाबत स्पष्टता आल्याचे सांगितले.
विस्तृत माहिती साठी येथे क्लिक करावे.


