BRICS ही आंतरराष्ट्रीय परिषद ब्राझील , रशिया , भारत , चीन , साऊथ आफ्रिका , इंडोनेशिया , इराण , सौदी अरेबिया , संयुक्त अरब अमिराती , इजिप्त , इथोपिया या 11 (उदयोन्मुख) देशांचे प्रतिनिधित्व करते.
2026 मध्ये आयोजित 18 व्या BRICS परिषदेचे अध्यक्षत्व भारताकडे आहे. 2009 पासून विविध देशांनी या ब्रिक्स परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे. या आधी भारतात 2012,2016 व 2021 मध्ये BRICS summit म्हणजे शिखर परिषद झाली आहे.
BRICS ब्रिक्स सिव्हील फोरम 2026 हे एक महत्त्वाचे संवाद पीठ आहे या मंचाद्वारे ब्रिक्स देशातील सामाजिक संस्था, विकास विषयात कार्यरत व्यक्ती, संस्था परस्परांशी संवाद साधून एक जननीति तयार करतात आणि त्याद्वारे समाजाच्या गरजा, प्राधान्यक्रम, धोरण राष्ट्रप्रमुखांसमोर चर्चेसाठी ठेवतात.
भारताच्या सिव्हील सोसायटी फोरम संबंधित समन्वय भारत सरकारच्या RIS Research and Information Systems for Developing Countries संस्थेद्वारे केले जाते आहे.
वर्ष 2026 मध्ये ब्रिक्स सिव्हील फोरम अंतर्गत चर्चेसाठी आरोग्य, शिक्षण, इकॉलॉजी, संस्कृती, अर्थव्यवहार,
सायबर इनफॉरमेशन सिक्यूरिटी, AI आणि उद्यमिता व सामाजिक विकास या विषयांची निश्चिती करण्यात आलेली आहे.
भारताच्या वतीने ‘Ecology’ या कार्यगटाचे को चेअरमन म्हणून नंदुरबार येथील डॉ गजानन डांगे , अध्यक्ष , योजक तसेच श्रीमती सविता सुलुगोडु, CEO, स्वामी विवेकानंद युथ मुव्हमेंट यांची निवड करण्यात आली.
‘ब्रिक्स सिव्हील फोरम’ची परिषद इंडीया हॅबीटाट सेंटर, दिल्ली येथे दिनांक 17-18 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहात सप्पन्न झाली. ब्रिक्स देशातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष या बैठकीत उपस्थित होते.
या बैठकीत इकॉलॉजी या कार्यगटाच्या गट चर्चेचे अध्यक्षपद डॉ. डांगे यांनी भूषविले. या चर्चेत विविध देशातील पर्यावरण व पारिस्थीतीकी या बद्दलचे प्रश्न त्यावरील सामाजिक संस्थांच्या अनुभवांचे आदान प्रदान करण्यात आले. तसेच सर्व ब्रिक्स देशांना अनुकरणीय अश्या मुद्यावर सहमती तयार करण्यात आली. या चर्चेतून जननीती पत्र तयार होऊन येत्याकाळात ब्रिक्स देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत या नीतीपत्रातील मागण्या सूचना सादर केल्या जातील.


